मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat kohli) IPL 2022 मधील खराब फॉर्म संपण्याचे नाव घेत नाही आहे. रविवारी (8 मे) सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यात कोहली खाते न उघडता बाद झाला.

जगदीशा सुचितच्या डावातील पहिल्या षटकाच्या पहिल्या बॉलवर कोहलीने हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनकडे सोपा झेल दिला. यासह कोहलीने एक लज्जास्पद विक्रमही आपल्या नावावर केल आहे.

IPL 2022 मध्ये पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर कोहली तिसऱ्यांदा पॅव्हेलियनमध्ये परतला. याआधी आयपीएल 2014 मध्ये तो तीन वेळा 0 धावांवर बाद झाला होता. आयपीएलच्या दोन मोसमात तीन वेळा शून्यावर बाद होणारा कोहली हा पहिला टॉप ऑर्डर खेळाडू आहे.

आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच कोहलीला तीनदा गोल्डन डक मिळाला आहे. याआधी, स्पर्धेच्या इतिहासात केवळ दोनदाच एका हंगामात खेळाडूला तीन गोल्डन डक मिळाले होते.

सुरेश रैना 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असताना आणि नितीश राणा 2020 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळत असताना. 2008 ते 2021 या कालावधीत खेळलेल्या 14 आयपीएल सीझनमध्ये कोहली केवळ तीन वेळा गोल्डन डकवर आउट झाला आहे.

या मोसमात कोहली पूर्णपणे फ्लॉप दिसत आहे. त्याने 12 सामन्यांमध्ये 19.64 च्या सरासरीने एकूण 216 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 58 आहे.

Leave a comment

Your email address will not be published.