मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमात आतापर्यंत दमदार खेळ दाखवणाऱ्या गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ आज संध्याकाळी भिडणार आहे. हंगामात पहिल्यांदा खेळायला गेलेल्या टीम गुजरातने मागील सलग तीन सामने जिंकले, तर हैदराबादने सलग दोन पराभवानंतर आतापर्यंत 5 सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघांनी संघर्ष केला आणि गुणतालिकेत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले. गुजरात संघ सध्या 7 पैकी 6 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. हैदराबादबद्दल बोलायचे झाले तर, गुजरातसोबत बरोबरीचे सामने खेळल्यानंतर हा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा सामना जिंकल्यानंतर दोन्ही संघांना अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे.
गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील हा सामना बुधवार, 27 एप्रिल रोजी होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.
गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा हॉटस्टारवर पाहता येणार आहे.