मुंबई : वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आयपीएल 2022 मध्ये आपल्या वेगानं वादळ निर्माण केलं आहे. सनरायझर्स हैदराबादचा हा युवा गोलंदाज प्रत्येक सामन्यात वेगवान चेंडू टाकत स्वतःला सिद्ध करत आहे.
या गोलंदाजाने विरोधी फलंदाजांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. त्यामुळेच उमरानच्या संघाने लीगमध्ये सलग पाच सामने जिंकले आहेत. मात्र, उमरान मलिक प्रतिस्पर्ध्यांचेच नव्हे तर टीम इंडियाचेही नुकसान करत आहे.
गुरुवारी हैदराबाद संघाचा सामना गुजरात टायटन्सशी झाला. हैदराबादला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते मात्र उमरानने पुन्हा एकदा आपल्या वेगवान कामगिरीने छाप पाडली. या सामन्यात त्याने गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या विकेटसह पाच विकेट घेतल्या.
उमरानने आयपीएलमध्ये एक-दोनदा हार्दिकला दुखापत केली आहे. गेल्या काही काळापासून हार्दिकचा फिटनेस चिंतेचा विषय आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात उमरानने पहिलाच चेंडू हार्दिक पांड्याला 145.4 किमी प्रतितास वेगाने टाकला.
चेंडू हार्दिकच्या खांद्यावर आदळला यावेळी हा बॉल हार्दिकला जोरात लागला. या बॉलवर हार्दिकला दुखापत देखील झाली. सामन्यानंतर हार्दिक दुखापतीवर आईस पॅक लावताना दिसला.
याआधी दोन्ही संघ शेवटच्या वेळी आमनेसामने आले तेव्हा उमरानचा चेंडू हार्दिकच्या हेल्मेटवर लागला. यावेळी हार्दिकला दुखापत झाल्यास टीम इंडियासाठी चिंतेचे कारण बनू शकते. हार्दिक व्यतिरिक्त उमरान उर्वरित भारतीय खेळाडूंसाठीही धोका ठरू शकतो.
हार्दिक पांड्याची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी पुरेशी आहे. टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी तो उत्सुक आहे. त्याचवेळी बीसीसीआय वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० विश्वचषकावरही लक्ष ठेवून आहे. हार्दिक या मोसमातही गोलंदाजी करत आहे.
अशा परिस्थितीत अष्टपैलू खेळाडू म्हणून टीम इंडियात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. लीग सुरू होण्यापूर्वीच याबाबत सातत्याने चर्चा होत आहे. आपल्या चांगल्या कामगिरीमुळे हार्दिकनेही या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. मात्र, उमरान बीसीसीआयच्या योजनेवर पाणी फिरवताना दिसत आहे.