पुणे : महेंद्रसिंग धोनीच्या (MS dhoni) नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) आयपीएलच्या 49व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (Royal Challengers Bangalore)13 धावांनी पराभव झाला. सीएसकेचा चालू मोसमातील हा सातवा पराभव आहे. आरसीबीने दिलेल्या 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेचा संघ 8 गडी गमावून 160 धावाच करू शकला.
या पराभवासाठी धोनीने फलंदाजांना जबाबदार धरले आहे. पराभवानंतर चेन्नईच्या कर्णधार म्हणाला, चांगली सुरुवात करूनही आम्ही नियमित अंतराने विकेट गमावल्या, ज्याचा फटका आम्हाला सहन करावा लागला. “आम्ही त्यांना 170 च्या आसपास रोखले होते. दुसऱ्या हाफमध्ये फलंदाजीसाठी विकेट चांगली असेल असे मला वाटले. आम्ही फलंदाजीची चांगली सुरुवात केली. सर्व काही आमच्या योजनेनुसार चालले होते. पण आमच्या फलंदाजांनी निराशा केली.”
“ध्येयाचा पाठलाग करणे हा मुल्यांकनाचा खेळ आहे. आमचे फलंदाज नीट मूल्यांकन करू शकले नाहीत. जेव्हा तुम्ही पाठलाग करत असता तेव्हा तुम्हाला किती धावांची गरज असते हे तुम्हाला माहीत असते आणि त्यावेळी तुम्ही तुमचे शॉट्स न खेळता सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळता.
चेन्नईचे 10 सामन्यांतील 3 विजयातून 6 गुण झाले असून गुणतालिकेत ते नवव्या क्रमांकावर आहे, तर आरसीबीने या विजयासह अव्वल 4 मध्ये प्रवेश केला आहे. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली सीएसकेने 11 सामने खेळले असून त्यात 6 जिंकले आहेत. आरसीबी 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
धोनी पुढे म्हणाला की, “त्याच्या संघाच्या गुणतालिकेऐवजी त्याच्या त्रुटींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चेन्नईकडून सलामीवीर डेव्हन कॉनवेने 37 चेंडूत 56 धावांची शानदार खेळी केली. मोईन अलीने 34 धावांचे योगदान दिले. सलामीवीर ऋतुराज गायकवाड 28 धावा करून बाद झाला. धोनी म्हणाला, ‘काय चुकलं ते पाहत राहायला हवं. गुणतालिका बघून तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. आम्ही गुणतालिकेत कुठे आहोत यावर नाही तर आमच्या त्रुटींवर लक्ष केंद्रित करत आहोत.
चेन्नईला आता लीग स्तरावर आणखी चार सामने खेळायचे आहेत. अशा परिस्थितीत, CSK ने आपले उर्वरित चार सामने जिंकले तरी त्यांचे केवळ 14 गुण असतील, जे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे नसतील. दुसरीकडे, आरसीबीला अजून तीन सामने खेळायचे आहेत. बंगळुरूकडून महिपाल लोमरने 42 धावा केल्या. चार षटकांत 35 धावा देत 3 बळी घेणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.