इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये, सोमवारी (18 एप्रिल), कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात सामना झाला. या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने कोलकाताचा सात धावांनी पराभव केला. या सामन्यात धावांचा डोंगर होता आणि शेवटच्या षटकापर्यंत थरार कायम होता. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या सामन्यात श्रेयस अय्यरने 85 धावा केल्या, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. कोलकात्याच्या पराभवानंतर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये श्रेयस अय्यर संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमसोबत वाद घालताना दिसत आहे. सामना संपत असताना पोस्ट शो दरम्यान हा व्हिडिओ दाखवण्यात आला.

श्रेयस अय्यर हातात बॅट आणि हेल्मेट घेऊन उभा होता आणि ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या ब्रेंडन मॅक्युलमशी बोलत होता. यादरम्यान, शोमध्ये उपस्थित अँकर, पाहुणे म्हणाले की कदाचित दोघेही फलंदाजीच्या क्रमावर चर्चा करत असतील. तथापि, याची पुष्टी करता येत नाही.

पण श्रेयस अय्यरची आक्रमक प्रतिक्रिया व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे, त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

कोलकाता-राजस्थान यांच्यातील सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत 217 धावांची डोंगराएवढी धावसंख्या उभारली. राजस्थानसाठी जोस बटलरने शतक झळकावले, जे त्याचे या मोसमातील दुसरे शतक होते. या सामन्यात राजस्थानकडून युझवेंद्र चहलनेही हॅटट्रिक घेतली.

कोलकाताच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर श्रेयस अय्यरच्या 85 आणि अॅरॉन फिंचच्या 58 धावा व्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज फार मोठी कामगिरी करू शकला नाही. यामुळेच शेवटच्या षटकात केवळ 11 धावांची गरज असतानाही कोलकाताला हा सामना जिंकता आला नाही.

Leave a comment

Your email address will not be published.