आयपीएल 2022 च्या पाचव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 61 धावांनी पराभव करून त्यांच्या खात्यात 2 गुण जमा केले. राजस्थान संघाने हैदराबादला विजयासाठी 211 धावांचे लक्ष्य दिले होते, परंतु केन विल्यमसनच्या संघाला 20 षटकांत केवळ 149 धावा करता आल्या.
हैदराबादच्या संघाने पॉवरप्लेमध्येच सामना गमावला कारण हैदराबादचे फलंदाज ट्रेंट बोल्ट आणि प्रसिद्ध यांच्यापुढे टिकू शकले नाहीत आणि त्यांना 6 षटकांत केवळ 14 धावा करता आल्या आणि या 6 षटकांत त्यांनी 3 विकेट्सही गमावल्या. पॉवरप्लेमध्ये अशा संथ फलंदाजीमुळे त्यांना ट्रोल देखील केले जात आहे. यातच वीरेंद्र सेहवागही ट्रोल केले आहे.
सामना संपण्यापूर्वीच वीरेंद्र सेहवागने हैदराबाद संघाला एक मीम शेअर करून ट्रोल केले, ज्यामध्ये लिहिले होते, “भाई ये तो आईपीएल में टेस्ट मैच चल रहा है”. सेहवागच्या या मीमवर चाहतेही मजेशीर कमेंट करत आहेत, यासह नेटकऱ्यांकडूनही हैदराबाद संघाला जोरदार ट्रोल करण्यात येत आहे.
या सामन्यात राजस्थानचा संजू सॅमसनने 25 चेंडूत अर्धशतक ठोकून चाहत्यांचे खूप मनोरंजन केले. यादरम्यान संजूने 5 गगनचुंबी षटकारही मारले. संजू व्यतिरिक्त जोस बटलर, देवदत्त पडिकल आणि शिमरॉन हेटमायर यांनीही दमदार खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.