सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये एका खेळाडूची सर्वाधिक चर्चा होत आहे. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आहे. या मोसमात त्याने बॅटने स्फोटक खेळी केली आहे. त्याचा फॉर्म पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून यात एबी डिव्हिलियर्सचेही नाव सामील आहे. दिनेश कार्तिकचा फॉर्म पाहता पुन्हा मैदानात उतरण्याची इच्छा झाली असल्याचे त्याने म्हंटले आहे.
दिनेश कार्तिकबद्दल बोलताना डिव्हिलियर्स म्हणाला, “तो सध्या ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे, त्याने आरसीबीसाठी आधीच दोन सामने जिंकले आहेत. असे दिसते आहे की तो त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याला हा फॉर्म कोठून मिळाला हे मला माहित नाही. कारण तो जास्त क्रिकेट देखील खेळला नाही. पण काय सांगू, तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे आणि विकेटच्या प्रत्येक बाजूला 360 डिग्री शॉट्स खेळत आहे.
“त्याला असे खेळताना पाहिल्यानंतर मला मैदानावर पुन्हा उतरण्याची इच्छा झाली आहे. मधल्या फळीत दडपणाखाली खेळून त्याने मला खूप प्रभावी केले आहे आणि त्याला दडपणाखाली खेळण्याचा इतका अनुभव असेल आणि जर त्याने त्याचा फॉर्म कायम ठेवला तर आरसीबीला पुढे जाण्याची चांगली संधी आहे.