मुंबई : आयपीएल 2022 च्या 15 व्या सामन्यात, केएल राहुलचा संघ लखनऊ सुपर जायंट्सने ऋषभ पंतचा संघ दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून पराभव केला. आयपीएल 2022 मधील लखनऊ सुपर जायंट्स संघाचा हा सलग तिसरा विजय आहे. केएल राहुलचा संघ 4सामन्यांत 3 विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.

नंबर 1 वर श्रेयस अय्यरचा संघ कोलकाता नाईट रायडर्स आहे. मात्र, KKR संघानेही 4 सामन्यात 3 विजय नोंदवले असून लखनऊ सुपर जायंट्ससारखे 6 गुण आहेत. KR सध्या नेट रन रेटच्या आधारावर पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान संघाचे 4 गुण आहेत.

तर गुजरात टायटन्स 2 सामन्यांत 2 विजयांसह 4 व्या क्रमांकावर आहे. इतर संघांबद्दल बोलायचे झाले तर धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्स, रोहित शर्माची टीम मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादची अवस्था सध्या खूपच दयनीय आहे. तिन्ही संघांनी आतापर्यंत आयपीएलमध्ये एकही विजय नोंदवला नाही.

यावेळेस आयपीएल 2022 मध्ये 10 संघ खेळत आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ आहेत ज्यांनी सुरुवातीपासूनच त्यांच्या खेळाने प्रभावित केले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *