आयपीएल 2022 च्या पाचव्या साखळी सामन्यात, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने हैदराबादविरुद्ध जबरदस्त फलंदाजीचे दृश्य सादर केले.

या सामन्यात राजस्थानने चांगली सुरुवात केली आणि याचा फायदा घेत संजू सॅमसनने सलामी दिली. संजूने 27 चेंडूत 55 धावांची खेळी केली आणि यावेळी त्याने 5 षटकार आणि 3 चौकार लगावले. संजू सॅमसन त्याच्या 5 षटकारांच्या जोरावर आयपीएलमध्ये राजस्थानसाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे,

हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात संजू सॅमसनने 5 षटकार मारून नवा विक्रम केला. तो आता राजस्थानकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. संजूने शेन वॉटसनला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. संजू सॅमसनने आयपीएलमध्ये राजस्थानसाठी आतापर्यंत एकूण 110 षटकार ठोकले आहेत, तर शेन वॉटसनने या संघासाठी एकूण 109 षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर जोस बटलर 67 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये राजस्थानसाठी सर्वाधिक षटकार ठोकणारे तीन फलंदाज

110 षटकार – संजू सॅमसन

109 षटकार – शेन वॉटसन

67 षटकार – जोस बटलर

संजू सॅमसन आयपीएलमध्ये राजस्थानसाठी सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज ठरला, तर हा विक्रम आरसीबीकडून ख्रिस गेलच्या नावावर नोंदवला गेला आहे. दुसरीकडे, मुंबईकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पोलार्डच्या नावावर आहे, तर धोनीने सीएसकेकडून ही अप्रतिम कामगिरी केली आहे. या बाबतीत डेव्हिड वॉर्नर हैदराबादचा तर आंद्रे रसेल केकेआरकडून पहिल्या क्रमांकावर आहे. दिल्लीसाठी ऋषभ पंत आणि पंजाबसाठी केएल राहुलने आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.

Leave a comment

Your email address will not be published.