मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) ५९व्या सामन्यात चेन्नई आणि मुंबई संघ आमनेसामने येणार आहेत. आयपीएलचा हा मोसम दोन्ही संघांसाठी खूपच वाईट गेला आहे. मुंबई आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे, चेन्नईला अजूनही आशा आहे की काही चमत्कारी कामगिरीमुळे त्यांना अंतिम चारमध्ये स्थान मिळू शकेल.
शेवटच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघ आमनेसामने आले असताना चेन्नईने मुंबईचा 3 विकेट्सने पराभव केला त्यामुळे मुंबईला आपल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी असेल. जर तुम्हालाही या दोन संघांमधील सामन्याचा आनंद घ्यायचा असेल, तर चला जाणून घेऊया या सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.
चेन्नई आणि मुंबई यांच्यातील हा सामना गुरुवार, १२ मे रोजी होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. तर सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. चेन्नई आणि मुंबई यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा हॉटस्टारवर पाहता येणार आहे.