मुंबई : चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सलामीचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने पुण्यातील एमसीए स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध शानदार फलंदाजी करताना 57 चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 99 धावा केल्या. गायकवाडचे भलेही शतक हुकले असतील पण त्याने सचिन तेंडुलकरच्या खास विक्रमाची बरोबरी केली.
या खेळीदरम्यान गायकवाडने आयपीएलमधील 1000 धावा पूर्ण केल्या. यासह, भारतीय फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याच्या बाबतीत तो या स्पर्धेत संयुक्तपणे प्रथम स्थानावर पोहोचला आहे. त्याने 31 डावात हे स्थान गाठले. सचिनने याच डावात 1000 धावांचा टप्पाही पार केला होता.
आयपीएलमध्ये सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम शॉन मार्शच्या नावावर आहे. मार्शने अवघ्या 21 डावात ही कामगिरी केली होती. त्याच्या खालोखाल लेंडल सिमन्स (23 डाव), मॅथ्यू हेडन (25 डाव), जॉनी बेअरस्टो (26 डाव), ख्रिस गेल (27 डाव), केन विल्यमसन (28 डाव), ऋतुराज गायकवाड (30 डाव) यांचा क्रमांक लागतो.
Ruturaj Gaikwad became the joint-fastest Indian to reach 1,000 IPL runs!#IPL2022 #CSKvSRH pic.twitter.com/VtvKgLBAun
— CRICKETNMORE (@cricketnmore) May 1, 2022
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गायकवाड आणि डेव्हन कॉनवे (नाबाद 85) यांनी पहिल्या विकेटसाठी 182 धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यामुळे चेन्नईने 2 गडी गमावून 202 धावा केल्या.