मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या 36 व्या सामन्यात विराट कोहली गोल्डन डकवर आऊट झाला. त्याचवेळी आरसीबीच्या उर्वरित फलंदाजांनीही निराशाजनक कामगिरी केल्याने संघ अवघ्या 68 धावांवर आटोपला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. हा सामना 23 एप्रिल रोजी खेळला गेला आणि या दिवशी RCB ने त्यांची दुसरी सर्वात कमी धावसंख्या केली. अशा परिस्थितीत आरसीबीसाठी २३ एप्रिल हा दिवस अशुभ असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

याआधी कोलकाता विरुद्ध बंगळुरूची टीम अवघ्या 49 रन्सवर ऑलआऊट झाली होती, तो सामनाही 23 एप्रिलला खेळला गेला होता. 2017 मध्ये जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघ अवघ्या 49 धावांवर ऑलआऊट झाला होता, तो दिवस 23 एप्रिल होता. आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे.

23 एप्रिललाच आरसीबीने केला होता एक मोठा विक्रम

2013 मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने IPL इतिहासात सर्वाधिक 263 धावा केल्या. बंगळुरू एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि पुणे वॉरियर्स यांच्यात हा सामना खेळला गेला. या सामन्यात तुफानी फलंदाज ख्रिस गेलने नाबाद १७५ धावांची खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) २६३ धावांच्या प्रत्युत्तरात पुणे वॉरियर्सचा संघ केवळ १३३ धावा करू शकला. अशा प्रकारे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) पुणे वॉरियर्सचा 130 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. आरसीबीने 23 एप्रिललाच आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्याही बनवली होती. आरसीबी आणि पुणे यांच्यातील हा सामना 23 एप्रिल 2013 रोजी झाला होता.

Leave a comment

Your email address will not be published.