gt
IPL 2022: Rashid and Tewatia's brilliant performance helped Gujarat to a great victory

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 40 व्या सामन्यात, रशीद खानच्या 11 चेंडूत 31 आणि राहुल तेवतियाच्या 21 चेंडूत 40 धावांच्या बळावर गुजरातने हैदराबादचा 5 गडी राखून पराभव केला.

हैदराबादने गुजरातसमोर 196 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ते गुजरातने 5 गडी गमावून पूर्ण केले. गुजरातसाठी शेवटच्या षटकात रशीद आणि तेवतियाने मार्को यानसेनच्या षटकात चार षटकार ठाकलेआणि आवश्यक 22 धावा केल्या.

रशीद आणि तेवातियाच्या खेळीसमोर उमरान मलिकची शानदार गोलंदाजी फ्लॉप ठरली. त्याने आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत 5 विकेट घेतल्या मात्र गुजरातला विजयापासून दूर ठेवता आले नाही. या विजयासह गुजरात गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचला असून त्यांच्या खात्यात आता 14 गुण जमा झाले आहेत.

गुजरातकडून रिद्धीमान साहाने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. तत्पूर्वी, गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माच्या 65 आणि एडन मार्करामच्या 56 धावांच्या जोरावर 195 धावा केल्या.

गुजरातचा डाव

196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या गुजरातला रिद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. गिल 22 धावांवर उमरान मलिकच्या गोलंदाजीवर बाद झाला. दुसरा धक्का हार्दिक पांड्याच्या रूपाने बसला, तो उमरानच्या बॉलवर यान्सेनच्या हाती झेलबाद झाला.

पांड्य फक्त 10 धावा करू शकला. साहा उमरानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 68 धावांची खेळी केली. हैदराबाद हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण रशीद आणि तेवतिया या जोडीने पुन्हा एकदा करिष्माई खेळी करून गुजरातला विजय मिळवून दिला.

हैदराबादचा डाव

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कर्णधार केन विल्यमसन आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादच्या डावाची सुरुवात केली. मात्र तिसऱ्या षटकातील 5व्या चेंडूवर विल्यमसन 5 धावा काढून बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने बोल्ड केले. राहुल त्रिपाठीला बाद करून शमीने दुसरा धक्का दिला. त्याने 16 धावांची खेळी केली. मार्कराम आणि अभिषेकने तिसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली.

अभिषेकने 65 धावांची खेळी केली. त्याला अल्झारी जोसेफने बोल्ड केले. हैदराबादला चौथा धक्का पूरनच्या रूपाने बसला, तो शमीच्या गोलंदाजीवर शुभमन गिलच्या हाती झेलबाद झाला. त्याने 3 धावा केल्या. मार्कराम ५वी विकेट म्हणून ५६ धावा करून बाद झाला. यश दयालने त्याला झेलबाद केले. वॉशिंग्टन सुंदर सहाव्या विकेटसाठी 3 धावांवर धावबाद झाला.

Leave a comment

Your email address will not be published.