मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) ५८ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)आणि राजस्थान रॉयल्स (Rajstahan royals) आमनेसामने येणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सला प्ले-ऑफच्या संधी जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांच्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

सध्या दिल्लीचा संघ 11 सामन्यांत 5 विजय नोंदवून 10 गुणांसह 5व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, राजस्थानचा संघ 11 सामन्यांत 7 विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यांना उर्वरित तीन सामन्यांत केवळ दोनच सामने जिंकायचे आहेत.

गेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव करत संघ येथे पोहोचला होता. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत संघ चांगली कामगिरी करत आहे, अशा स्थितीत दिल्लीसमोर राजस्थानचा वरचष्मा दिसत आहे. तुम्हालाही या सामन्याचा आनंद घ्यायचा असेल, तर चला जाणून घेऊया या सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.

दिल्ली आणि राजस्थान यांच्यातील हा सामना बुधवारी, ११ मे रोजी होणार आहे. हा सामना डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. तर सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

दिल्ली आणि राजस्थानमधील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published.