मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमात, राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals)सामना डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात शनिवारी, 7 मे रोजी पंजाब किंग्जशी (Punjab Kings) होईल.

राजस्थान संघाने या मोसमात चांगला खेळ दाखवला असून सध्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबच्या संघाची कामगिरी संमिश्र असून सातव्या क्रमांकावर आहे.

संजू सॅमसनच्या राजस्थानला गेल्या सलग दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे, तर पंजाबने शेवटचा सामना जिंकला आहे. दोन्ही संघांमधील हा या मोसमातील पहिला सामना असणार आहे.

पंजाबला प्लेऑफच्या अशा कायम ठेवण्यासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. संघाने 10 सामन्यांनंतर 5 विजय मिळवले आहेत तर राजस्थानने तेवढेच सामने खेळून 6 विजय मिळवले आहेत.

राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हा सामना शनिवार, ७ मे रोजी होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. तर सामन्याचा नाणेफेक दुपारी 3 वाजता होणार आहे.

राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published.