मुंबई : गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya मुंबई इंडियन्सचा स्टार किरॉन पोलार्डसोबत (Kieron Pollard) चांगले संबंध आहेत. पांड्या आणि पोलार्ड यांचे मुंबई इंडियन्ससोबत खूप चांगले संबंध आणि आठवणी आहेत. पोलार्डने पुढील मोसमात गुजरात टायटन्सकडून खेळावे अशी इच्छा गुजरातच्या कर्णधाराने व्यक्त केली आहे.
पोलार्डविषयी बोलताना पांड्या म्हणाला, “पोलार्डचा दिवस चांगला जावा अशी माझी इच्छा आहे. मी त्याला काही दिवसांपूर्वी मेसेजही केला होता की तू ठीक आहेस का आशा करतो की तू बरा आहेस. मी त्याला म्हणाला होतो की, आम्हाला तुझी खूप आठवण येते. मी त्याला गमतीत म्हणालो, तू पुढच्या वर्षी आमच्या संघाकडून खेळशील? ही माझी इच्छा आहे पण मला माहित आहे की ते कधीच होणार नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून पोलार्ड आणि पांड्या मुंबई इंडियन्ससाठी एकत्र खेळले आहेत. पांड्या ब्रदर्सचे पोलार्डशी चांगले संबंध आहेत. मैत्रीही खूप चांगली आहे. मुंबईकडून खेळताना हे सर्वांनी पाहिले आहे. या मोसमात पंड्याला सोडून मुंबईने वेगळा संघ निवडण्याचा प्रयत्न केला. अशात गुजरातने पांड्याला संघाचा कर्णधार बनवले. गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवण्यासाठी गुजरात टायटन्सने आत्तापर्यंत दमदार कामगिरी केली आहे.
गुजरातच्या संघाने चांगली कामगिरी केली आहे. तर दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा संघ यंदा वाईट टप्प्यातून जात आहे. मुंबई इंडियन्सचा संघ प्ले ऑफमधून बाहेर पडला आहे. रोहित शर्माचा फॉर्मही चिंतेचा विषय आहे. याशिवाय पोलार्डलाही या मोसमात धावा करता आल्या नाहीत.