मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ शनिवारी 30 एप्रिल रोजी होणार्या डबल हेडर सामन्यात आमनेसामने येतील. नव्या मोसमात नव्या कर्णधारासह बंगळुरूने या मोसमात चांगला खेळ दाखवला आहे.
पण, त्यांच्यासमोर गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरातच्या टायटन्सचा या मोसमात प्रथमच सामना असेल. जिथे बंगळुरूला गेल्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे, तिथे गुजरात सलग चार सामने जिंकून पुढे येत आहे.
बेंगळुरूच्या संघाला आता प्लेऑफमधील आपला दावा मजबूत करण्यासाठी उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत. आतापर्यंत 9 सामने खेळल्यानंतर, संघाने 5 जिंकले आहेत आणि सध्या गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहे. गुजरातने 8 सामन्यांपैकी फक्त एक सामना गमावला असून 14 गुणांसह ते पहिल्या स्थानावर आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना शनिवार, 30 एप्रिल रोजी होणार आहे. हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. आणि नाणेफेक अर्धा तास आधी दुपारी 3 वाजता होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा हॉटस्टारवर पाहता येणार आहे.