jadeja vs worner
IPL 2022: Not only Jadeja but 5 other players have resigned from the captaincy in the middle of IPL

मुंबई : आयपीएल 2022 च्या मध्यावर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या कर्णधारात बदल झाला आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी रवींद्र जडेजाला चेन्नईचा कर्णधार बनवण्यात आले होते, मात्र नुकतेच रवींद्र जडेजाने सीएसकेचे कर्णधारपद सोडले आहे.

पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. आयपीएलच्या मध्यावर कर्णधाराने कर्णधारपद सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंनी मोसमाच्या मध्यावर कर्णधारपद सोडले आहे.

2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ची कमान दिनेश कार्तिककडे होती. कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकात्याची कामगिरी फारच खराब होती. यानंतर आयपीएलमध्ये त्याच्या जागी इऑन मॉर्गनला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार बनवण्यात आले.

सनरायझर्स हैदराबाद (SRH) ला IPL चॅम्पियन बनवणारा डेव्हिड वॉर्नर हा एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने २०१६ साली विजेतेपद पटकावले होते. पण 2021 मध्ये त्याची कामगिरी खूपच खराब झाली. अशा स्थितीत त्याला मध्य मोसमात कर्णधारपदावरून दूर करण्यात आले. त्याच्या जागी केन विल्यमसनला कर्णधार बनवण्यात आले.

डेव्हिड मिलरने आयपीएलमध्ये कर्णधारपदही भूषवले आहे. 2016 मध्ये डेव्हिड मिलरला पंजाब संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते, मात्र त्याच्या नेतृत्वाखाली संघाचा खेळ खूपच खराब झाला होता. आयपीएलच्या मध्यंतरी त्याच्या जागी मुरली विजयला संघाचा कर्णधार बनवण्यात आले.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक गौतम गंभीर हा देखील आयपीएलच्या मध्यावर कर्णधारपद सोडणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. 2018 मध्ये गौतम गंभीरने आयपीएलचे कर्णधारपद सोडले. त्याच्या जागी संघाची कमान श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली होती.

अजिंक्य रहाणे देखील आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. 2019 मध्ये, अजिंक्य रहाणेला राजस्थान रॉयल्स (RR) चे कर्णधार बनवण्यात आले होते, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याच्याकडून आयपीएलचे कर्णधारपद काढून घेण्यात आले आणि स्टीव्ह स्मिथला कर्णधार बनवण्यात आले.

Leave a comment

Your email address will not be published.