मुंबई : IPL 2022 चा 18 वा लीग सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात MCA स्टेडियम, पुणे येथे खेळला गेला. या सामन्यात 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूने मुंबईचा 7 गडी राखून पराभव केला. मुंबईविरुद्धच्या विजयासह आरसीबीचा या मोसमातील हा तिसरा विजय आहे.
मुंबईसाठी या मोसमाची सुरुवात खूप खराब झाली, मुंबई इंडियन्सच्या (एमआय) पराभवाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात 7 विकेट्स गमावल्याने मुंबईला या मोसमातील चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना संघाकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा होती मात्र या पराभवामुळे त्यांची निराशा झाली आहे.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 151 धावा केल्या. यानंतर प्रत्युत्तरादाखल आरसीबीने हे लक्ष्य ३ विकेट्स राखून पूर्ण केले. सलग चौथ्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सची ट्विटरवर खिल्ली उडवण्यात आली.