मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या २३व्या सामन्यात पहिला विजय मिळवण्याच्या शोधात मुंबईचा सामना पंजाब किंग्जशी होणार आहे. एकीकडे रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ बॉलिंग तसेच बॅटिंगमध्ये फ्लॉप दिसत आहे. तर दुसरीकडे पंजाबचे फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. गेल्या सामन्यात पंजाब संघाला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या संघाला पुन्हा विजयी मार्गावर यायचे आहे.

दुसरीकडे, मुंबईला या मोसमात आपली उपस्थिती जाणवून द्यायची असेल, तर चेन्नईप्रमाणेच त्याला बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत चमत्कार करावे लागतील. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव वगळता एकही फलंदाज त्यांच्या क्षमतेनुसार फलंदाजी करू शकला नाही. या सामन्यातही मुंबईला पुनरागमन करता आले नाही, तर त्यांच्यासाठी पुढील वाटचाल कठीण होईल.

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हा सामना बुधवार, 13 एप्रिल रोजी होणार आहे. हा सामना एमसीए स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार, सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. आणि नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published.