मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमात सोमवारी संध्याकाळी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबईच्या संघाचा (MI) सामना कोलकात्याशी (KKR) होणार आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी अतिशय लाजिरवाणी झाली आहे. रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखालील संघ तळाला, तर श्रेयस अय्यरचा (Shreyash iyyar) संघ 9व्या क्रमांकावर आहे.
मुंबईच्या संघाने आतापर्यंत 11 सामने खेळून दोन सामने जिंकले आहेत, तर कोलकाताने 10 सामने खेळून केवळ 4 सामने जिंकले आहेत. रोहितचा संघ पॉइंट टेबलवर कायम असताना येथून उर्वरित 3 सामने जिंकून स्पर्धेचा शेवट करू शकतो. कोलकाता त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकून टिकून राहण्याचा प्रयत्न करेल.
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा सामना सोमवार, ९ मे रोजी होणार आहे. यांच्यातील हा सामना डीवाय पाटील, मुंबई येथे होणार आहे. हा सामना संध्याकाळी भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता सुरू होईल. तर सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा हॉटस्टारवर पाहता येणार आहे.