मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या खेळाडूंमधील नाते खूप चांगले आहे. याचे कारण त्यांचे सर्व प्रमुख खेळाडू अनेक वर्षांपासून एकत्र खेळत आहेत. या कारणामुळे अनेकदा खेळाडूंमध्ये हशा-मस्करी होत असते. रवींद्र जडेजा, एमएस धोनी, ड्वेन ब्राव्हो हे अनेक सीझन CSK चा भाग आहेत आणि हे खेळाडू एकमेकांना चांगले ओळखतात.
चेन्नई सुपर किंग्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये एमएस धोनी, ड्वेन ब्राव्हो आणि ऋतुराज गायकवाड एकत्र बसून मैदानावर काढलेल्या फोटोंवर त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. यादरम्यान एमएस धोनीने ड्वेन ब्राव्होला ट्रोल केले. धोनी म्हणाला की, गेल्या 10-12 वर्षांत त्याने ब्राव्होला कधीच गोलंदाजी कशी करावी हे सांगितले नाही.
वास्तविक फोटोत ड्वेन ब्राव्हो एमएस धोनीला काहीतरी सांगत आहे. हा फोटो पाहून धोनी म्हणाला, “ब्राव्हो म्हणत आहे की माझा मेंदू काम करत नाही, जो फक्त अर्धा आहे. मी ब्राव्होला एवढेच सांगतो की, तुम्हाला हवे तसे गोलंदाजी करा, पण अशी विविधता आणू नका. जेव्हा ब्राव्हो खूप महागडा ठरत होता तेव्हाचे हे फोटो आहेत, आणि मी त्याच्याकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी द्यायची का आणि मी स्वत: गोलंदाजी करायची का असा विचार करत होतो कारण मी इतकी खराब गोलंदाजी करणार नाही.”
आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी आतापर्यंत खूपच खराब राहिली आहे. संघाने 8 पैकी 6 सामने गमावले असून केवळ 2 सामने जिंकले आहेत. जडेजाच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंतच्या कामगिरीने बऱ्यापैकी निराश केले आहे.