लखनऊ सुपर जायंट्स गुरुवारी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्धच्या त्यांच्या दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही संघांना पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. चेन्नईला कोलकाता आणि लखनऊला गुजरातकडून पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही संघ या सामन्यात विजयाचे खाते उघडण्याच्या इराद्याने उतरतील.

या सामन्यात अष्टपैलू मोईन अली चेन्नईच्या संघात पुनरागमन करेल. व्हिसाच्या समस्येमुळे जो पहिल्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध नव्हता. नवीन कर्णधार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली गतविजेत्या चेन्नईचा फलंदाजीचा क्रम पहिल्या सामन्यात ढासळला होता. मात्र, कर्णधार एमएस धोनीचा फॉर्म संघासाठी आनंदाची बातमी आहे. त्याने कोलकाताकडून नाबाद अर्धशतक झळकावले. मोईन अलीच्या आगमनानंतर मिचेल सँटनरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. याशिवाय संघात आणखी काही बदल होण्याची शक्यता कमी आहे.

सर्वांच्या नजरा लखनऊ संघातील दीपक हुडा (55) आणि आयुष बडोनी (54) यांच्यावर असतील. दोघांनीही शानदार फलंदाजी करत लखनऊला खराब सुरुवातीपासून पुढे नेले. याशिवाय आघाडीच्या फळीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. कर्णधार केएल राहुल, क्विंटन डी कॉक आणि एविन लुईस गुजरातविरुद्ध फ्लॉप ठरले. पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करणे कठीण आहे.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेवन :

केएल राहुल (क), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, दुष्मंथा चमिरा, मोहसिन खान, रवी बिश्नोई, आवेश खान.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेवन :

ऋतुराज गायकवाड, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा (क), एमएस धोनी (विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, मिचेल सँटनर/ डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, अॅडम मिल्ने

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *