मुंबई : ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली, दिल्ली कॅपिटल्सने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्स सोबत सामना केला. लखनऊचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
कर्णधार केएल राहुलच्या 77 धावा आणि दीपक हुडाच्या 52 धावांच्या जोरावर लखनऊ संघाने 20 षटकांत 3 बाद 195 धावा केल्या. आणि दिल्ली समोर 196 धावांचे लक्ष ठेवले, पण या संघाला 20 षटकात 7 गडी गमावून 189 धावा करता आल्या आणि 6 धावांनी पराभव पत्करावा लागला. या विजयासह लखनऊचाचा संघ 14 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
दिल्लीचा डाव
दिल्लीला पहिला झटका सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉच्या रूपाने बसला, तो 5 धावांवर दुष्मंथा चमीराच्या हाती झेलबाद झाला. दिल्लीची दुसरी विकेट डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने पडली जो 3 धावांवर मोहसीन खानच्या हाती बादझाला. मिचेल मार्श ३७ धावांवर गौतमकडे झेलबाद झाला. रवी बिश्नोईच्या चेंडूवर 3 धावा काढून ललित यादव बाद झाला. ऋषभ पंतने 30 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या.
पॉवेलने 35 धावा केल्या आणि मोहसीन खानच्या हाती झेलबाद झाला तर शार्दुल ठाकूरला मोहसीन खानने एक धाव घेत बाद केले. अक्षर पटेल 42 तर कुलदीप यादव 16 धावांवर नाबाद राहिला. लखनऊसाठी मोहसीन खानने 4 षटकात 16 धावा देऊन 4 बळी घेतले आणि तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
लखनऊचा डाव
शार्दुल ठाकूरने लखनऊ संघाला पहिला धक्का दिला आणि त्याने सलामीवीर फलंदाज डी कॉकला 23 धावांवर बाद केले. डी कॉकला ललित यादवने कॅच आऊट केले. दीपक हुडाने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, तर 34 चेंडूत 52 धावा करत तो शार्दुल ठाकूरच्या झेलबाद झाला. कर्णधार केएल राहुलने 51 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 77 धावांची खेळी केली आणि शार्दुल ठाकूरच्या हाती झेलबाद झाला. मार्कस स्टॉइनिस 17 धावांवर नाबाद राहिला तसेच कृणाल पांड्याने 9 धावा केल्या. दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने तीन बळी घेतले.
दिल्लीविरुद्धच्या या सामन्यासाठी लखनऊच्या संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल काही बदल केले. या सामन्यासाठी आवेश खानला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी कृष्णप्पा गौतमला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर या सामन्यासाठी दिल्लीने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.