मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील 53 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) संघ आज संध्याकाळी कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) भिडणार आहे. सलग पाच पराभवानंतर संघाने शेवटचा सामना जिंकल्यामुळे कोलकातासाठी हा सामना अधिक महत्त्वाचा आहे.

कोलकाताने 10 सामन्यांनंतर फक्त चार विजय मिळवले आहेत तर लखनऊने समान सामन्यांनंतर 7 विजय नोंदवले आहेत. लखनऊचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर कोलकाताचा संघ सध्या आठव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये टिकण्यासाठी कोलकाताला आपला खेळ उंचवावा लागेल.

लखनऊ संघाविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागेल. या मॅचपूर्वी जाणून घ्या सामन्याशी संबंधित सर्व माहिती. लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा सामना शनिवार, ७ मे रोजी होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.
तर सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published.