Kuldeep Yadav
IPL 2022: Kuldeep Yadav gave a big reaction to the match with Yuzvendra Chahal

मुंबई : युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे दोघेही सध्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहेत. हे दोन्ही खेळाडू सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत. असे असतानाही कुलदीपची चहलने सर्वाधिक विकेट्स घेऊन पर्पल कॅप जिंकावी अशी इच्छा आहे.

राजस्थान रॉयल्सकडून खेळताना युझवेंद्र चहलने आतापर्यंत 8 सामन्यात 12.61 च्या सरासरीने 18 विकेट्स घेतल्या आहेत. या आयपीएल मोसमात त्याने हॅटट्रिकही केली आहे. तर दुसरीकडे कुलदीप यादवही त्याच्या मागे आहे. त्याने आतापर्यंत 8 सामन्यात 14.11 च्या सरासरीने 17 बळी घेतले आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये एकमेकांना मागे टाकण्याची स्पर्धा लागली आहे.

मात्र, कुलदीप यादवला युझवेंद्र चहलने पर्पल कॅप आपल्या नावावर करण्याची इच्छा आहे. तो म्हणाला की तो चहलला आपला मोठा भाऊ मानतो. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीनंतर कुलदीप यादव म्हणाला, “मला युझवेंद्र चहलशी स्पर्धा कधीच जाणवली नाही. तो माझ्या मोठ्या भावासारखा आहे आणि जेव्हा मी जखमी झालो तेव्हा त्याने मला खूप साथ दिली. या वर्षी त्याने पर्पल कॅप जिंकावी अशी माझी मनापासून इच्छा आहे.

Leave a comment

Your email address will not be published.