मुंबई : आयपीएल 2022 च्या 37 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला. या सामन्यात पुन्हा एकदा मुंबईचे फलंदाज फ्लॉप ठरले. यात किरन पोलार्डचाही समावेश आहे. 20 चेंडूत 19 धावा करून तो बाद झाला. सामन्याच्या शेवटच्या षटकात क्रुणाल पांड्याने पोलार्डला बाद केले.
क्रुणालने पोलार्डची विकेट घेताच मैदानावर एक मजेदार घटना घडली. शेवटच्या 6 चेंडूत मुंबईला विजयासाठी 39 धावांची गरज होती. क्रुणालच्या पहिल्याच चेंडूवर पोलार्डने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू पूर्णपणे बॅटवर आला नाही आणि डीप मिडविकेटवर उभ्या असलेल्या दीपक हुडाने त्याचा झेल घेतला. पोलार्डला बाद केल्यानंतर क्रुणाल इतका आनंदी झाला की त्याने पोलार्डच्या डोक्याचे चुंबन घेतले.
पोलार्डला पाहून त्याला क्रुणालची ही कृती आवडली नाही असे दिसले, यावेळी तो कोणतीही प्रतिक्रिया न देता पॅव्हेलियनमध्ये परतला. सामन्याच्या शेवटच्या षटकात क्रुणालने डॅनिएल सॅमची विकेट घेतली तसेच पोलार्डलाही बाद केले. त्याच्या षटकात जयदेव उनाडकटही धावबाद झाला.
याआधी सामन्यात पोलार्डने क्रुणालला बाद करून मजेदार प्रतिक्रिया दिली होती. आयपीएल 2022 मध्ये किरन पोलार्डची कामगिरी काही विशेष झाली नाही. या वर्षात त्याला एकही अर्धशतक ठोकता आलेले नाही.
सामना संपल्यानंतर क्रुणाल पोलार्डबद्दल म्हणाला की, “पोलार्ड बाद झाल्याबद्दल मी खूप आभारी होतो, नाहीतर त्याने मला आऊट केल्याचे माझ्या मनात राहिले असते. आता 1-1 आहे. म्हणजे प्रकरण बरोबरीचे आहे. मला आनंद आहे.”
https://twitter.com/cric_big_fan/status/1518289513113522177?s=20&t=YwTglE2cvOoYr5VIO_mOLA
क्रुणाल-पोलार्ड एमआयसाठी एकत्र खेळले
कृणाल पांड्या आणि किरन पोलार्ड गेल्या मोसमापर्यंत मुंबई इंडियन्सकडून खेळायचे. दोघांनी मुंबईला अनेक प्रसंगी संस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. पण आयपीएल 2022 पूर्वी मुंबईने पोलार्डला कायम ठेवले होते. त्याचवेळी हार्दिक आणि कृणाल यांना सोडण्यात आले. हार्दिक पांड्या या हंगामात गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. तर कृणाल लखनऊकडून खेळत आहे. या मोसमात दोन्ही संघ चांगली कामगिरी करत आहेत. त्याचबरोबर त्यांचा जुना संघ मुंबई सलग 8 सामने गमावून प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.