मुंबई : आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग आहे. दरवर्षी एकापेक्षा जास्त खेळाडू या लीगमध्ये खेळायला येतात. आयपीएलमध्ये जगातील मोठ्या खेळाडूंना संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे खूप कठीण आहे. IPL 2022 दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे.

या लीगमधील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एकाने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. त्याला योग्य वागणूक दिली गेली नाही आणि त्याला योग्य तो सन्मान मिळाला नाही, असे या ज्येष्ठ म्हंटले आहे.

युनिव्हर्सल बॉस म्हणून प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गेल कोणत्याही संघाचा भाग नाही.

नुकतेच त्याने एका वृत्ताला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “गेल्या काही वर्षांपासून ज्या प्रकारे आयपीएल होत आहे, आयपीएलमध्ये मला जो सन्मान मिळायला हवा तो मिळाला नाही. तसेच मला योग्य वागणूकही मिळाली नाही. पण मला वाटले ठीक आहे, तुम्हाला योग्य तो सन्मान मिळाला नाही. म्हणून मी ते तसेच सोडले. क्रिकेट नंतर जीवन नेहमीच असते. त्यामुळे मी सामान्य होण्याचा प्रयत्न करत आहे.”

ख्रिस गेल आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्जकडून खेळला आहे. आयपीएलमध्ये पुनरागमन करण्याबाबत गेल म्हणाला, “पुढच्या वर्षी मी पुनरागमन करत आहे. आयपीएलला माझी गरज आहे. मी आयपीएलमध्ये केकेआर, आरसीबी आणि पंजाबचे प्रतिनिधित्व केले आहे. मला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू किंवा पंजाब किंग्ज यापैकी एकासाठी विजेतेपद पटकावायला आवडेल. माझा आरसीबीसोबतचा प्रवास खूप छान होता. पंजाबसाठी मी खूप यशस्वी झालो. मला आव्हाने आवडतात, बघूया काय होते.”

गेल शेवटचा पंजाब किंग्जकडून २०२१ मध्ये आयपीएलमध्ये खेळला होता. 2021 च्या टी-20 विश्वचषकानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

ख्रिस गेलने 142 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 4965 धावा केल्या आहेत. यादरम्यान ख्रिस गेलचा स्ट्राइक रेटही १४८.९६ राहिला आहे. आयपीएलच्या इतिहासात गेलच्या नावावर सर्वाधिक शतके आहेत. गेलने आयपीएलमध्ये 6 शतके झळकावली आहेत. ख्रिस गेलनेही आयपीएलच्या इतिहासात 357 षटकार ठोकले आहेत.

ख्रिस गेलने आयपीएलमध्ये एकदा एकट्याने १७५ धावांची इनिंग खेळली आहे. आयपीएलमधील सर्वात जलद शतकाचा विक्रमही ख्रिस गेलच्या नावावर आहे. आरसीबीकडून खेळताना ख्रिस गेलने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध हा पराक्रम केला होता. या सामन्यात गेलने 30 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.

Leave a comment

Your email address will not be published.