POWEL

मुंबई : प्रत्येक यशामागे एक कथा असते. जीवन एक संघर्ष आहे. आपण ज्या क्रिकेटपटूबद्दल बोलत आहोत त्याची कहाणी काही कमी वेदनादायक नाही. त्याच्या जीवाला इतर कोणाकडून नाही तर त्याच्या स्वतःच्या वडिलांकडून धोका होता. त्याचा जीव कसा वाचला? हे त्याने सांगितले आहे.

पण त्याआधी आपण क्रिकेटच्या मैदानावरील त्याच्या फॉर्मबद्दल जाणून घेऊया. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की तो क्रिकेटर देखील आयपीएलचा एक भाग आहे. आणि केवळ भागच नाही तर तो एक वादळ आहे. हा खेळाडू बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर या खेळाडूने 6 षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हा खेळाडू म्हणजे रोव्हमन पावेल.

तुम्हाला या क्रिकेटरचे नाव तर कळले आहे. आता जाणून घेऊया क्रिकेटरची कामगिरी आणि जाणून घेऊ त्याने वडिलांपासून कसा आपला जीव वाचवला. रोव्हमन पॉवेल हा दिल्ली कॅपिटल्सचा एक भाग आहे. आणि 5 मे रोजी संध्याकाळी ब्रेबॉर्नच्या खेळपट्टीवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने चमकदार कामगिरी केली.

रोव्हमन पॉवेलने दिल्ली कॅपिटल्सची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेण्याच्या उद्देशाने वादळी खेळी केली. 28 वर्षीय पॉवेलने 35 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या. सुमारे 192 च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या या खेळीत त्याने 6 षटकार ठोकले. याशिवाय डावाच्या शेवटच्या षटकात उमरान मलिकच्या चेंडूवर तीन चौकारही मारले.आयपीएलच्या खेळपट्टीवर रोव्हमन पॉवेलचे हे पहिले अर्धशतक होते, ज्याने दिल्लीच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.

रोव्हमन पॉवेल यांनी केलेले काम जाणून घेतल्यानंतर आता त्यांच्याशी संबंधित किस्सा जाणून घेऊया. आयपीएल 2022 मध्ये रोव्हमन पॉवेलचा तुफानी रंग जो तुम्हाला पाहायला मिळतो आहे, तो कदाचित पाहता आला नसता. याचे कारण म्हणजे, एका रिपोर्टनुसार पावेलने आजपर्यंत त्याच्या वडिलांना पाहिलेले नाही.

तो आईच्या पोटात असतानाच त्याच्या वडिलांना त्याला मारायचे होते. ESPNCricinfo मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जेव्हा त्याची आई गरोदर होती, तेव्हा त्याच्या वडिलांची इच्छा होती की तिने गर्भपात करावा. पण, आईने त्यांचे न ऐकता मुलगा पावेलला जीवदान दिले. आज त्याच आईची कृपा आहे, की जागतिक क्रिकेटला रोव्हमन पॉवेल मिळाले आहे.

Leave a comment

Your email address will not be published.