मुंबई : अखेर चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांना आयपीएल समारोप सोहळ्याचा आनंद लुटता येणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या वेळी समारोप सोहळा होणार असल्याची घोषणा बीसीसीआयकडून (BCCI) नुकतीच करण्यात आली.

कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे गेल्या चार वर्षांपासून आयपीएलशी संबंधित कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता, मात्र यावेळी जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

यापूर्वी 2018 मध्ये आयपीएल सोहळा पार पडला होता. त्यामुळे यावेळी समारोप सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची तयारी सुरू आहे. यावेळी प्रेक्षकांसाठी रणवीर सिंग आणि ए आर रहमान सारखे कलाकार या दिवशी परफॉर्म करताना दिसणार आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका इंग्रजी वेबसाईट सांगितले की, या कार्यक्रमात भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिनही साजरा केला जाणार आहे.

इतकंच नाही तर या कार्यक्रमात भारतीय क्रिकेटनं गेल्या ७ दशकांत साधलेला प्रवास पाहणार आहोत. ते म्हणाले की, अहमदाबादमधील अंतिम सामन्यासह, आम्ही एका खास शोद्वारे भारतीय क्रिकेट प्रवासाचे प्रदर्शन करून देशाच्या 75 व्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करू.

फायनल व्यतिरिक्त, दोन क्वालिफायर सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, बोर्डाने इडन गार्डन्स मैदान निवडले आहे. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, येथे दोन छोटे कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे. मात्र, तो कोणत्या प्रकारचा कार्यक्रम असेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील अंतिम सामना आणि भारतीय क्रिकेटच्या काही माजी कर्णधारांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल.

मात्र, या कार्यक्रमात कोणते कर्णधार सहभागी होणार याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हा कार्यक्रम भारत सरकारच्या “आझादी का अमृत महोत्सव” उपक्रमांतर्गत भारताच्या 75 व्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करेल.

Leave a comment

Your email address will not be published.