मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) शुक्रवारी (6 मे) गुजरात टायटन्सविरुद्ध स्फोटक फलंदाजी करताना 43 धावांची खेळी केली. यादरम्यान रोहितच्या बॅटमधून एक षटकार निघाला, त्यामुळे काझीरंगाच्या गेंड्यांना भेट म्हणून पूर्ण 5 लाख रुपये मिळणार आहेत.

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या डावातील दुसऱ्या षटकात कॅरेबियन गोलंदाज अल्झारी जोसेफविरुद्ध सहाव्या चेंडूवर हवेत गोळीबार करताना षटकार खेचला, त्यामुळे आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील गेंड्यांना 5 लाख रुपये मिळणार आहेत.

रोहितच्या बॅटमधून निघालेला हा चेंडू थेट टाटा पंच कारमध्ये गेला, त्यामुळेच या शॉटने रोहितच्या खात्यात केवळ सहा धावा जमा झाल्या नाहीत, तर गेंड्यांना भेट म्हणून पाच लाख रुपयांचा फायदा झाला आहे.

टाटा मोटर्स आयपीएल प्रायोजित करत आहे. अशा स्थितीत त्यांच्याकडून अशी घोषणा करण्यात आली की, जर कोणत्याही फलंदाजाने त्यांच्या टाटा पंच कार किंवा टाटा पंच बोर्डावर शॉट मारला तर आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला पाच लाख रुपये दिले जातील.

यामुळेच रोहितने आता कोणत्या ना कोणत्या प्रकारे अनेक उदात्त कामात हातभार लावला आहे. विशेष म्हणजे, रोहित शर्मा प्राण्यांवरचे प्रेम दाखवण्यासाठी अनेक मोहिमा चालवताना दिसत आहे.

दुसरीकडे, या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, रोहित शर्माच्या संघाने गुजरात टायटन्सला 178 धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात रोहित शर्माने 28 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. त्याचवेळी टीम डेव्हिडने तुफानी शैलीत 21 चेंडूत 44 धावा केल्या आहेत.

Leave a comment

Your email address will not be published.