मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १५ व्या मोसमाच्या प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला चेन्नई सुपर किंग्स(CSK) संघ रविवारी डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात अव्वल संघ गुजरात टायटन्सशी भिडणार आहेत.

एकीकडे चेन्नई आता सन्मान वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे, तर गुजरात २० गुण मिळवून अव्वल स्थानावर राहण्याचे लक्ष्य समोर ठेवणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या यांच्यातील हा सामना पाहणे रंजक ठरणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना रविवार, 14 मे रोजी होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. तर सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published.