आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने चांगली सुरुवात केली आहे. KKR 3 पैकी दोन सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, आता संघ आणखी मजबूत होणार आहे. याच कारण म्हणजे मॅच विनर गोलंदाजाचे पुनरागमन होत आहे.

ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स केकेआरमध्ये सामील झाला असून त्याचा क्वारंटाईन कालावधी सोमवारी संपणार आहे. तो 6 एप्रिलपासून सामना खेळण्यासाठी सज्ज असेल. KKR चा पुढील सामना 6 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध आहे. अशा स्थितीत कमिन्स या सामन्यात खेळण्याची पूर्ण अपेक्षा आहे.

पॅट कमिन्सला संघात सामील करून घेतल्याने KKR हेड कोच ब्रेंडन मॅक्युलमला खूप आनंद झाला आहे. तो म्हणाला की, “कमिन्स हा असा खेळाडू आहे, जो वातावरणाशी सहज जुळवून घेतो. त्याच्याकडे नेतृत्व कौशल्य देखील आहे. अशा स्थितीत कर्णधार म्हणून आपली छाप सोडण्यात यशस्वी ठरलेल्या श्रेयस अय्यरलाही त्याच्या उपस्थितीचा फायदा होईल. तथापि, कमिन्सच्या पुनरागमनामुळे केकेआरला प्लेइंग इलेव्हन निवडणे कठीण होऊ शकते. कारण त्याच्या अनुपस्थितीत टीम साऊदीने केकेआरसाठी शानदार गोलंदाजी केली आहे.

याबाबत प्रशिक्षक मॅक्युलम म्हणाले, “निवड आता आमच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण आता आमच्याकडे प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी अधिक खेळाडू असतील, मला वाटते की ही समस्या संघासाठी चांगली आहे.”

पॅट कमिन्स यंदा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत कमिन्सने सर्वाधिक बळी घेतले होते. त्याने 3 कसोटीत 22.50 च्या सरासरीने 12 बळी घेतले. त्याचबरोबर ऍशेस मालिकेतही कर्णधार आणि गोलंदाज म्हणून त्याने अविस्मरणीय कामगिरी केली होती. आता त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती आयपीएलमध्ये करायला आवडेल. कमिन्सने आयपीएलच्या 37 सामन्यात 38 विकेट घेतल्या आहेत. तो पॉवरप्लेमध्ये तसेच डेथ ओव्हर्समध्येही चांगली गोलंदाजी करतो.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *