Glenn Maxwell
IPL 2022: Glenn Maxwell becomes first foreign player to do so, breaks Rashid Khan's record

मुंबई : आरसीबीचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघाची पुन्हा निराशा केली. आरसीबीने 37 धावांत दोन विकेट गमावल्या, आणि विराट कोहली आणि कर्णधार डू प्लेसिस पॅव्हेलियनमध्ये परतले. अशा परिस्थितीत संघाला मॅक्सवेलकडून खूप आशा होत्या, पण त्यानेही निराशा केली.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मॅक्सवेलला कुलदीप सेनने खातेही उघडू दिले नाही आणि तो गोल्डन डकवर बाद झाला. या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर, ग्लेन मॅक्सवेल हा आयपीएलमध्ये शून्यावर बाद होणारा परदेशी फलंदाज ठरला.

मॅक्सवेल राजस्थानविरुद्ध खाते न उघडता बाद झाला आणि आयपीएलमध्ये शून्यावर विकेट गमावण्याची त्याची 12वी वेळ होती. आता तो या लीगमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा विदेशी खेळाडू बनला आहे. मॅक्सवेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 11 वेळा शून्यावर बाद झालेला अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानला मागे टाकले आहे. आता परदेशी खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये शून्यावर बाद होण्याच्या बाबतीत राशिद खान दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर ग्लेन मॅक्सवेल पहिल्या क्रमांकावर आला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होणारे खेळाडू

12 – ग्लेन मॅक्सवेल

11 – राशिद खान

10 – सुनील नरेन

10 – एबी डिव्हिलियर्स

9 – ख्रिस मॉरिस

9 – जॅक कॅलिस

या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रियान परागच्या नाबाद अर्धशतकाच्या (56 धावा) बळावर राजस्थानने 20 षटकांत 8 बाद 144 धावा केल्या. आरसीबीला विजयासाठी 145 धावा करायच्या होत्या आणि लक्ष्य फार मोठे नव्हते, पण आरसीबीच्या फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. आरसीबीची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. यात कोहली पुन्हा फ्लॉप ठरला तो फक्त 9 धावा करू शकला. या सामन्यात आरसीबीने 19.3 षटकात 115 धावा केल्या आणि 29 धावांनी पराभव पत्करावा लागला.

Leave a comment

Your email address will not be published.