मुंबई : रोमहर्षक सामन्यात मुंबईला पराभूत करून इथपर्यंत पहचणाऱ्या चेन्नईचा उत्साह उंचावला आहे. संघाकडे गमावण्यासारखे काहीच नाही कारण या हंगामात त्यांच्या खात्यात फक्त 2 विजय आहेत. शेवटच्या सामन्यात एमएस धोनीने शेवटच्या 4 चेंडूत 16 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
दुसरीकडे पंजाबला दिल्लीकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला. त्या सामन्यात फलंदाजांनी सजलेल्या पंजाबच्या संघाला केवळ 115 धावाच करता आल्या होत्या. सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागलेल्या मयंक अग्रवालच्या संघाला हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा पल्लवित करायच्या आहेत. चला तर जाणून घेऊया या सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.
चेन्नई आणि पंजाब यांच्यातील हा सामना सोमवार, 25 एप्रिल रोजी होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सामना संध्याकाळी भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता सुरू होईल. तर नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.
चेन्नई आणि पंजाबमधील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा हॉटस्टारवर पाहता येणार आहे.