chahl
IPL 2022: Do or die match for Kolkata; Know when and where to watch the match?

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामात आज संध्याकाळी कोलकाता नाईट रायडर्सचा संघ राजस्थान रॉयल्सशी भिडणार आहे. संजू सॅमसनच्या संघाने आतापर्यंत खूप चांगला खेळ दाखवला असून ते प्लेऑफचे दावेदार दिसत आहेत. दुसरीकडे, कोलकाताने चांगल्या सुरुवातीनंतर सलग पाच सामने गमावले आहेत, या स्थितीत संघाच्या प्लेऑच्या अशा दुरावल्या आहेत.

सध्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर कोलकाताचा संघ 9 सामन्यांनंतर केवळ 3 विजय मिळवून आठव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थानने कोलकात्यापेक्षा 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि तीन पराभवानंतरही संघ अव्वल चारमध्ये कायम आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणारा सामना कोलकाताला जिंकणे आवश्यक आहे. राजस्थानचा विजय त्यांना प्लेऑफच्या जवळ घेऊन जाईल.

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा सामना सोमवार, 2 मे रोजी होणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published.