मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या मोसमात सलग सामने गमावल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना आज संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. महेंद्रसिंग धोनीने चेन्नई संघाची कमान पुन्हा आपल्या हातात घेतली आहे. चेन्नईच्या संघाने शेवटचा सामना जिंकला होता तर बेंगळुरूने सलग तीन सामने गमावले आहेत.
पॉइंट टेबलकडे लक्ष दिलं तर सध्या बेंगळुरू आणि चेन्नई या दोन्ही संघांची अवस्था वाईट आहे. फाफ डू प्लेसिसच्या संघाने 10 पैकी 5 सामने जिंकले असून ते सहाव्या स्थानावर आहे. त्याचवेळी धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 9 सामने खेळल्यानंतर केवळ तीन विजयांची नोंद केली आहे. संघ 6 गुणांसह 9व्या स्थानावर आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील हा सामना बुधवार, 4 मे रोजी होणार आहे. हा सामना पुणे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. सामना संध्याकाळी भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता सुरू होईल. तर सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा हॉटस्टारवर पाहता येणार आहे.