मुंबई : पंजाब आणि गुजरात यांच्यात डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात शिखर धवनच्या 62 आणि लिव्हिंगस्टनच्या स्फोटक 30 धावांच्या जोरावर पंजाबने गुजरात संघाचा 8 गडी राखून पराभव केला. पंजाबसमोर विजयासाठी 144 धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी 24 चेंडू बाकी असताना 2 गडी गमावून पूर्ण केले.
16 व्या षटकात लिव्हिंग्स्टनने मोहम्मद शमीच्या षटकात 3 षटकार आणि 2 चौकारांसह 28 धावा केल्या. या विजयासह पंजाब 10 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचले आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना साई सुदर्शनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 8 बाद 143 धावा केल्या.
पंजाबचा डाव
144 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाचा शिखर धवन आणि जानी बेअरस्टो यांनी डावाची सुरुवात केली पण तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मोहम्मद शमीने बेअरस्टोला सांगवानच्या हाती झेलबाद केले. त्याने 1 धाव काढली. त्यानंतर राजपक्षे आणि धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची शानदार भागीदारी केली. पंजाबला दुसरा धक्का राजपक्षेच्या रूपाने बसला. तो 40 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर लॉकी फर्ग्युसनच्या हाती एलबीडब्ल्यू आऊट झाला.
गुजरातचा डाव
पंजाबविरुद्ध गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली आणि सलामीवीर फलंदाज शुभमन गिलचा खराब फॉर्म कायम राहिला. तो 9 धावा करून धावबाद झाला, तर त्याचा साथीदार साहा 21 धावांवर रबाडाच्या गोलंदाजीवर मयंक अग्रवालच्या हाती झेलबाद झाला. हार्दिक पांड्याला ऋषी धवनने जितेश शर्माच्या हाती झेलबाद केले.
डेव्हिड मिलरने 14 धावा केल्या आणि त्याला रबाडाने लियाम लिव्हिंगस्टोनच्या हाती झेलबाद केले. राहुल तेवतिया 11 धावांवर रबाडाच्या गोलंदाजीवर संदीप शर्माच्या हाती झेलबाद झाला, तर राशिद खान खातेही उघडू शकला नाही आणि तो गोल्डन डकवर बाद झाला. रबाडाने रशीद खानला जितेश शर्माच्या झेलबाद केले.
साई सुदर्शनने 42 चेंडूत षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसरीकडे, प्रदीप सांगवान 2 धावांवर अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर बाद झाला. रबाडा 5 धावांवर लकी फर्ग्युसनकडे झेलबाद झाला. साई सुदर्शनने या सामन्यात 50 चेंडूंचा सामना करत एक षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 64 धावा केल्या. दुसरीकडे पंजाबकडून कागिसो रबाडाने 4 षटकांत 34 धावा देत 4 बळी घेतले.