DELHI

मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 41व्या सामन्यात दिल्लीने वानखेडे मैदानावर कोलकात्याचा 4 गडी राखून पराभव केला. दिल्लीला विजयासाठी 147 धावांची गरज होती जी त्यांनी 6 चेंडू राखून पूर्ण केली. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने 42 आणि पॉवेलने 33 धावांची शानदार खेळी केली.

तत्पूर्वी, दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताकडून ऍरॉन फिंच आणि व्यंकटेश अय्यर यांनी डावाची सुरुवात केली पण दोघेही लवकरच बाद झाले. नितीश राणाचे अर्धशतक आणि श्रेयस अय्यरच्या 42 धावांच्या जोरावर कोलकाताने दिल्लीसमोर 9 गडी गमावून 146 धावा केल्या.

147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही आणि डावाच्या पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉने विकेट गमावली. उमेश यादवने त्याच्याच चेंडूवर त्याला झेलबाद केले. दिल्लीला दुसरा धक्का मार्शच्या रूपाने मिळाला, तो हर्षित राणाच्या बॉलवर व्यंकटेशच्या हाती झेलबाद झाला. त्याने 13 धावा केल्या. दिल्लीला वॉर्नरच्या रूपाने तिसरा धक्का बसला. त्याचे अर्धशतक हुकले आणि 42 धावांवर तो उमेशच्या बॉलवर नरेनच्या हाती झेलबाद झाला.

11व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ललित यादव बाद झाला. त्याला नरेनने एलबीडब्ल्यू आऊट केले. पुढच्याच चेंडूवर दिल्लीने कॅप्टन पंतची विकेट गमावली. त्याला उमेशने इंद्रजीतच्या हाती झेलबाद केले. त्याला केवळ 2 धावा करता आल्या. अक्षर पटेल सहाव्या विकेटसाठी धावबाद झाला. त्याने 24 धावांची खेळी केली.

ऍरॉन फिंच आणि व्यंकटेश अय्यर यांनी कोलकात्याकडून डावाची सुरुवात केली पण दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर दिल्लीकडून पदार्पण करणाऱ्या चेतन साकारियाने त्याला क्लीन बोल्ड केले. त्याला फक्त 3 धावाच करता आल्या. कोलकाताला दुसरा धक्का व्यंकटेश अय्यरच्या रूपाने बसला, तो 6 धावांवर चेतन साकारियाच्या हातून अक्षर पटेलकडे झेलबाद झाला. तिसरी विकेट म्हणून पदार्पण करणारा इंद्रजीत बाद झाला. त्याने 6 धावा केल्या. तो पावेलच्या बॉलवर कुलदीपकडे झेलबाद झाला.

याच षटकात कुलदीपने सुनील नरेनलाही बाद केले. कर्णधार अय्यरच्या रूपाने कोलकाताला पाचवा धक्का बसला, 42 धावांवर कुलदीपने त्याला पंतच्या हाती झेलबाद केले. याच षटकात कुलदीपने रसेललाही यष्टीचीत केले. त्याला खातेही उघडता आले नाही. मुस्तफिझूरने पावेलच्या हाती रिंकू सिंगला 7वी विकेट म्हणून झेलबाद केले, त्याने 23 धावा केल्या. 8 वा धक्का नितीश राणाच्या रूपाने बसला, त्याने 57 धावा केल्या. त्याला चेतन साकारियाच्या हाती मुस्तफिझूरने झेलबाद केले. पुढच्याच चेंडूवर त्याने साऊथीला क्लीन बोल्ड केले.

दिल्ली दोन तर कोलकाताचा संघ 3 बदलांसह मैदानात उतरला. दिल्लीने खलील अहमद आणि सरफराजच्या जागी चेतन साकारिया आणि मिशेल मार्शला, तर कोलकाताने बाबा इंद्रजीत, ऍरॉन फिंच आणि हर्षित राणाला आणले.

Leave a comment

Your email address will not be published.