मुंबई : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा संघ कहर करत आहे. IPL 2022 मध्ये, गुजरात संघाने आतापर्यंत खेळलेल्या 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. 12 गुणांसह गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातच्या या यशामागे प्रशिक्षक आशिष नेहरा यांचाही मोलाचा वाटा आहे.
आशिष नेहरा मैदानावर फुल ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसतो आणि खेळाडूंसोबत बऱ्याच महत्वाच्या गोष्टी शेअर करत असतो. दरम्यान, आशिष नेहराचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, जिथे एकीकडे मुख्य प्रशिक्षक आणि इतर संघांचे सपोर्ट स्टाफ लॅपटॉपसह रणनीती आखताना दिसत आहेत.
तर दुसऱ्या बाजूला आशिष नेहरा दिसत आहे, ज्याची स्वतःची एक वेगळी स्टाईल आहे. उलटी टोपी, हातात कागद, आणि पेनने आशिष नेहरा विरोधी संघाविरुद्ध रणनीती आखताना दिसत आहे. आशिष नेहराचा हाच फोटो व्हायरल होत आहे.
या फोटोवर युजर्सकडून तीव्र प्रतिक्रियाही दिल्या जात आहेत. 3 इडियट्सच्या प्रसिद्ध डायलॉगसह एक मीम शेअर करताना एका यूजरने लिहिले की, ‘कुछ तो बात थी, “तो फक्त कागद आणि पेनने सामना जिंकता होता.” दुसरीकडे, आणखी एका यूजरने नेहराशी संबंधित एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये नेहरा रशीद खानसोबत सीमारेषेवर चर्चा करताना दिसत आहे.
Ashish Nehra supremacy #KKRvsGT #IPL2022 pic.twitter.com/POkvqNHrlQ
— D Jay (@djaywalebabu) April 23, 2022
काहीही असो पण गुजरात टायटन्स आयपीएल 2022 मध्ये आपला झेंडा फडकावत आहे. IPL 2022 च्या प्लेऑफमध्ये पात्र होण्यापासून गुजरातचा संघ काही विजय दूर आहे. हार्दिक पांड्याचे कर्णधारपद आणि नेहराचे प्रशिक्षकपद सध्यातरी उत्तम दिसत आहे.