चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सलामीवीर डेव्हन कॉनवे पुढील एक आठवडा निवडीसाठी उपलब्ध होणार नाही कारण तो त्याच्या लग्नासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. कॉनवेने सीएसकेसाठी आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे. त्यामुळे संघाला त्याची फारशी उणीव भासणार नाही.

कॉनवे 24 एप्रिल रोजी संघात परत येईल. नियमांनुसार, खेळाडूला तीन दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. प्रोटोकॉल अंतर्गत असे करणे आवश्यक असेल. तो चेन्नईकडून दोन सामने खेळण्यास अनुपलब्ध असेल.

पुढील सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना 21 एप्रिल रोजी होणार आहे. यानंतर 25 एप्रिलला चेन्नईचा सामना पंजाब किंग्जविरुद्ध होणार आहे. या सामन्यानंतर चेन्नई सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर 1 मे रोजी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. यादरम्यान सनरायझर्स हैदराबादचा संघ त्यांच्याविरुद्ध असेल.

डेव्हॉन कॉनवे या मोसमात आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे आणि लीगचा पहिला सामना KKR विरुद्ध होता. यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. चेन्नईकडून सलामीची जबाबदारी रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड बजावत आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज संघाची यंदाच्या हंगामात आयपीएलमध्ये कामगिरी विशेष राहिलेली नाही. सलग 4 सामने गमावल्यानंतर चेन्नईच्या संघाला पाचव्या सामन्यात विजयाची नोंद करण्याची संधी मिळाली. यानंतर चेन्नईला आणखी एका सामन्यात पराभव पत्करावा लागला. चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध संघाची कामगिरी कशी होते हे पाहायचे आहे.

Leave a comment

Your email address will not be published.