मुंबई : राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) शनिवारी आयपीएलमध्ये इतिहास रचला. या टी-20 लीगच्या चार हंगामात 20 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा चहल हा दुसरा गोलंदाज ठरला आहे.

या लेगस्पिन गोलंदाजाने आयपीएलच्या ५२व्या सामन्यात पंजाब किंग्जविरुद्ध ३ विकेट घेतले. यासह चहलने या मोसमात 20 विकेट्सचा टप्पाही पार केला. चहलने मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या विक्रमाची बरोबरी केली.

लसिथ मलिंगाने आयपीएलमध्ये चार वेळा 20 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. चहलने भानुका राजपक्षे, मयंक अग्रवाल आणि जॉनी बेअरस्टो यांसारख्या बड्या फलंदाजांना पंजाबविरुद्ध पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

या फिरकी गोलंदाजाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने पंजाबला १८९ धावांत रोखले. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना चहलने तीन वेळा २० प्लस विकेट्स घेतल्या होत्या. 2015, 2016 आणि 2020 मध्ये त्याने ही कामगिरी केली होती.

लसिथ मलिंगाने 2011, 2012, 2013 आणि 2015 मध्ये आयपीएलमध्ये 20 पेक्षा जास्त विकेट घेतल्या होत्या. चहल हा राजस्थान रॉयल्सचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजही ठरला आहे.

याआधी, राजस्थानसाठी एका मोसमात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रेयस गोपालच्या नावावर होता, ज्याने 2019 मध्ये 20 विकेट्स घेतल्या. चहलने आयपीएलच्या 15 व्या मोसमात आतापर्यंत 11 सामन्यांत 22 विकेट्स घेतल्या आहेत.

Leave a comment

Your email address will not be published.