मुंबई : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दिल्ली संघाने केवळ 8 गडी राखून सामना जिंकला नाही तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आपल्या शक्यताही बळकट केल्या. या मोठ्या विजयानंतर दिल्ली संघाच्या नेट रनरेटमध्येही सुधारणा झाली आहे. पण पृथ्वी शॉच्या (Pruthvi show) अनुपस्थितीत टीमची सलामीची जोडी गेल्या दोन सामन्यांत कमकुवत दिसत आहे.

अशा स्थितीत सामन्यानंतर जेव्हा पंतला पृथ्वी शॉच्या पुनरागमनाबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, डॉक्टरांनी त्याला टायफॉइड झाला असल्याची माहिती दिली, पंत पुढे म्हणाला की, “आम्ही देखील त्याला मिस करत आहोत पण ते आपल्या नियंत्रणात नाही.

तापामुळे पृथ्वी शॉला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो देखील शेअर केला होतो ज्यामध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर दिसत होता. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “मला आशा आहे की लवकरच परत येतील.”

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने अश्विनच्या 50 आणि देवदत्त पडिक्कलच्या 48 धावांच्या जोरावर दिल्लीसमोर 160 धावा केल्या, जे दिल्ली संघाने केवळ 2 गडी गमावून सहज गाठले. दिल्लीकडून मिचेल मार्शने 89 आणि डेव्हिड वॉर्नरने 52 धावा केल्या.

Leave a comment

Your email address will not be published.