andra rasel
IPL 2022: Andre Russell sets a unique record in a single over, the first bowler to do so in IPL history.

मुंबई : कोलकाता नाइट रायडर्सचा (KKR) अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने शनिवारी (23 एप्रिल) IPL 2022 च्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध शानदार गोलंदाजी करत एक अनोखा विक्रम केला. रसेलने फक्त 1 षटक टाकले आणि 5 धावांत 4 बळी त्याच्या खात्यात जमा केले. रसेलने राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल यांची विकेट घेतली.

रसेलने डावाच्या 20व्या षटकात हा पराक्रम केला. आयपीएलच्या इतिहासात एका षटकात चार विकेट घेणारा रसेल हा पहिला खेळाडू ठरला आहे. याशिवाय या स्पर्धेत एका षटकात चार विकेट घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात गुजरात टायटन्सने केकेआरचा 8 धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरात पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. गुजरातच्या 156 धावांना प्रत्युत्तर देताना कोलकाता संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 148 धावाच करू शकला.

Leave a comment

Your email address will not be published.