मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या २२ केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून बुधवार दिनांक 4 जानेवारी, गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत  प्रसारित होणार आहे.

मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व्हावा, दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा अधिक वापर होण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करणे, जगभरातील मराठी बांधव एकत्र यावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने मराठी तितुका मेळवावा या उदात्त हेतूने ‘विश्वमराठी संमेलन 2023’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाविषयी मराठी भाषा मंत्री श्री. केसरकर यांनी  ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून विस्तृत माहिती दिली आहे. निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी ही मुलाखत घेतली आहे.