मुंबई : भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यावर जाणार आहे. तिथे भारतीय संघ मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका खेळणार आहे. तीन एकदिवसीय मालिकेशिवाय भारतीय संघ तेथे पाच टी-20 सामने खेळणार आहे.

त्रिनिदादमध्ये वनडे खेळण्याव्यतिरिक्त, ब्रायन लारा स्टेडियमवर टी-20 सामने खेळवले जातील. त्रिनिदादमध्ये 22, 24 आणि 27 जुलै रोजी वनडे सामने खेळवले जातील. यानंतर, पहिला टी-20 सामना 29 जुलै रोजी ब्रायन चार्ल्स लारा स्टेडियमवर खेळवला जाईल.

पुढील दोन टी-20 सामने 1 आणि 2 ऑगस्ट रोजी सेंट किट्स आणि नेव्हिसमधील वॉर्नर पार्कवर खेळले जातील. 6 आणि 7 ऑगस्ट रोजी फ्लोरिडामध्ये शेवटचे दोन टी-20 सामने होणार आहेत.

1 ते 17 जुलै या कालावधीत युनायटेड किंगडममध्ये एक कसोटी, तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांचे व्यस्त वेळापत्रक पूर्ण केल्यानंतर भारतीय संघ 18 जुलै रोजी यूके ते त्रिनिदादला जाणार आहे. भारतीय संघ आयर्लंडमार्गे यूकेला पोहोचेल.

भारतीय संघाला आयर्लंडमध्ये दोन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. हे सामने डब्लिनमध्ये खेळवले जातील. 9-19 जून दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या घरच्या टी-20 मालिकेनंतर, भारतीय संघाच्या दोन तुकड्या (कसोटी संघातील एक) 20 जून रोजी आयर्लंड आणि इंग्लंडला रवाना होण्याची अपेक्षा आहे.

भारतीय संघ गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेतील सर्व सामने खेळू शकला नव्हता. कोरोना व्हायरसमुळे भारतीय संघ शेवटचा कसोटी सामना खेळू शकला नाही. यावर्षी जुलैमध्ये घेण्याचे प्रस्तावित आहे.

अशा स्थितीत भारतीय संघ ती मालिका पूर्ण करेल. भारतीय संघ सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडिया हीच कामगिरी इंग्लंडमध्ये कायम राखण्यात यशस्वी ठरते का, हे पाहायचे आहे.

Leave a comment

Your email address will not be published.