मुंबई : भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. आता दुसरा टी-20 सामना जिंकण्यासाठी कर्णधार ऋषभ पंत (Rishabh pant) टीम इंडियामध्ये तीन मोठे बदल करू शकतो. या खेळाडूंनी पहिल्या सामन्यात अत्यंत खराब कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत हे खेळाडू दुसऱ्या टी-20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असू शकतात.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अक्षर पटेलने अतिशय खराब खेळ दाखवला. गोलंदाजीत तो प्रावीण्य दाखवू शकला नाही. त्याने चार षटकात 40 धावा दिल्या आणि त्याला फक्त 1 विकेट घेता आली. त्याच्याविरुद्ध प्रतिस्पर्धी फलंदाजांनी जोरदार धावा केल्या. अशा स्थितीत कर्णधार ऋषभ पंत त्याला दुसऱ्या टी-20 सामन्यातून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. त्यांच्या जागी व्यंकटेश अय्यरचा समावेश केला जाऊ शकतो.

युझवेंद्र चहल हा आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. त्याने 27 विकेट्स आपल्या नावावर केल्या, पण तो आयपीएलमधील कामगिरीची तो पुनरावृत्ती करू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने दोन षटकांत २६ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही. अशा परिस्थितीत दुसऱ्या टी-20 सामन्यातून त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. त्यांच्या जागी रवी बिश्नोईला संधी मिळू शकते. बिश्नोई काही चेंडूतच सामन्याचा मार्ग बदलतो.

IPL 2022 मध्ये उमरान मलिकने आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली आहेत. आयपीएल 2022 च्या 14 सामन्यांत त्याने 22 विकेट घेतल्या. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजीतील तो महत्त्वाचा दुवा बनला आहे. त्याचवेळी प्रशिक्षक राहुल द्रविडनेही त्याचे कौतुक केले आहे. अशा स्थितीत त्याला दुसऱ्या टी-20 सामन्यात आवेश खानच्या जागी संधी मिळू शकते.