नवी दिल्ली : मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियावर पुन्हा एकदा मालिका वाचवण्याची जबाबदारी आहे. गेल्या सामन्यात गोलंदाजांच्या स्फोटक कामगिरीने टीम इंडियाच्या मालिकेतील आशा जिवंत ठेवल्या. कर्णधार म्हणून ऋषभ पंतचा (Rishabh pant) हा पहिलाच विजय होता.

चौथ्या टी-20 मध्ये, जेव्हा टीम इंडिया धोकादायक दिसणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी सामना करेल, तेव्हा त्यांना पुन्हा एकदा मागील सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करायची आहे.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ फिरकी गोलंदाजांसमोर हतबल झाला असून या सामन्यात संघाला आपली चूक सुधारायची आहे. तुम्हालाही या सामन्याचा आनंद घ्यायचा असेल, तर चला जाणून घेऊया या सामन्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना शुक्रवार, १७ जून रोजी होणार आहे. हा सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे होणार आहे. तर सामन्याचा नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क किंवा हॉटस्टारवर पाहता येणार आहे.