मुंबई : भरताने आशिया चषक स्पर्धेची सुरुवात शानदार विजयाने केली आहे. मागच्या वर्षी T20 विश्वचषक, फेरीत याच मैदानावर टीम इंडियाचा पाकिस्तानने पराभव केला होता. त्या परभावाची परतफेड करत भारतीय संघाने कालचा सामना जिंकला. या विजयाचा लाखो चहत्यानी आनंद सजरा केला. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपल्या कुटुंबासह या विजयचा जल्लोष केला. शरद पवारांच्या या अनोखा सेलिब्रेशनचा व्हिडिओ खासदार सुप्रिया सुळेंनी शेअर केला. हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकून आशिया चषकाची चांगली सुरुवात केली. हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा हे टीम इंडियाच्या विजयाचे नायक ठरले.

भारत-पाकिस्तान यांच्यातला हा सामना शेवटपर्यंत रोमांचक होता, शेवटी जडेजाने विकेट गमावल्या नंतर हा सामना पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने झाला होता, पण मैदानावर पांड्या होता, हे विसरून कसे चालेल, शेवटच्या तीन बॉलमध्ये भारतीय संघाला सहा धावांची गरज होती, यावेळी हार्दिकने फिनिशरची भूमिका बजावत सिक्स लगावला आणि हा रोमहर्षक सामना जिंकला.

भारताच्‍या या थरारक विजयानंतर शरद पवारांनी कुटुंबासोबत जल्लोष केला. त्यांचा हा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे, हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काल झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याचा अष्टपैलू खेळ (३-२५ आणि नाबाद ३३) आणि भुवनेश्वर कुमारच्या (४-२६) उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर भारताने २०२२ च्या आशिया चषक स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव केला. पाकिस्तानच्या 147 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने 2 बॉल बाकी असताना 5 विकेट्स गमावून विजय मिळवला.