नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना भारतीय संघाने जिंकला आहे. सामन्यादरम्यान दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत झाली. मात्र, येथे भारतीय संघ बाजी मारण्यात यशस्वी ठरला. यासोबतच ब्लू आर्मीने ICC पुरुष T20 विश्वचषक 2021 मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे.

दुबईत पाक संघाविरुद्धच्या धाडसी विजयानंतर टीम इंडियाचे खूप कौतुक होत आहे. देशातील सध्याचे आणि माजी क्रिकेटपटूही सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघाचे विजयाबद्दल अभिनंदन करत आहेत. तसेच सोशल मीडियावर भारतीय सांघाचे भरभरून कौतुक होत आहे.

कालच्या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक गमावून भारतासमोर १४८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ग्रीन संघासाठी मोहम्मद रिझवान हा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने संघासाठी 42 चेंडूत 43 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने हे लक्ष्य दोन चेंडू बाकी असताना पाच विकेट्सच्या मोबदल्यात सहज गाठले. संघासाठी कोहली (35), जडेजा (35) आणि पंड्या (नाबाद 33) यांनी सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पंड्याला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले आहे.

ट्विट पुढीप्रमाणे-